Is Bhatat Sevak Samaj "Sanitary Inspector" Diploma Government Approved?/ भारत सेवक समाज डिप्लोमा शासन मान्य आहे का?

जाणून घेऊया, भारत सेवक समाज बोर्ड शासनमान्य आहे का...

     भरारत सेवक समाज (BSS) ही तत्कालीन नियोजन आयोगाच्या (Planning Commission) मान्यतेने सन 1952 मध्ये स्थापन झालेली एक स्वायत्त संस्था आहे.

    या संस्थेकडून specialized courses (allied health services) अंतर्गत Diploma in sanitary health inspector हे एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येते. 

   अर्चना वालझाडे (अवर सचिव महाराष्ट्र शासन) याच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजीच्या मार्गदर्शक पत्रानुसार भारत सेवक समाज या संस्थेचा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील इतर शासनमान्य संस्थेच्या अभ्यासक्रमास समकक्ष आहे. त्यामुळे BSS म्हणजेच भारत सेवक समाज या स्वायत्त संस्थेचा sanitary inspector डिप्लोमा आरोग्य विभाग भरती 2023 करिता ग्राह्य धरण्यात आला आहे.

    BSS मान्यतेचे पत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

महत्वाचे: भरत सेवक समाज या संस्थेला केंद्र सरकारची अभ्यासक्रम शिकविण्यासाठी परवानगी असली तरी सदर बोर्डाने महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कॉलेजला किंव्हा इंस्टीट्यूट ला sanitary health inspector हा डिप्लोमा शिकवण्याची परवानगी दिलेली नाही आणि याची BSS च्या website व्यतिरिक्त कोठेही नोंद नाही. 

 BSS मान्यताप्राप्त इंस्टीट्यूट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टीप : आता जरी BSS बोर्ड ला मान्यता असली तरी आरोग्य विभागाने जारी केलेल्या पात्र कॉलेज च्या यादी मध्ये BSS अधिकृत कोणत्याही कॉलेज चे नाव नाही. त्यामुळे डिप्लोमा करताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या पात्र कॉलेज च्या यादी मधल्या कॉलेज मधूनच करावा.

आरोग्य विभागाच्या पात्र कॉलेजची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Sanitary Inspector Government Approved Colleges In Maharashtra / सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स महाराष्ट्रातील शासन मान्य संस्था

Arogya Sevak Salary / Arogya Seval Pay Scale/ आरोग्य सेवक पदाचा पगार

Arogya Sevak Job Profile/ work (आरोग्य सेवक कामे/ कर्तव्य व जबादाऱ्या )