Arogya Sevak Job Profile/ work (आरोग्य सेवक कामे/ कर्तव्य व जबादाऱ्या )
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) गट क, या पदाचे कर्तव्य व जबाबदऱ्या. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमांर्गत प्रत्येक ५००० लोकसंख्येकरीता , आदिवासी आणि डोंगराळ भाग्यकारीत ३००० लोकसंख्येकरीता एक उपकेंद्र स्थापन करून तेथे एक बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) व एक आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आलेली आहे. आरोग्य सेवकाने त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी पंधरा दिवसात एकदा भेट देणे आवश्यक आहे. १) हिवताप नियंत्रण कार्यक्रम. दर पंढरवाड्याल प्रत्येक घरी जाऊन तापीच्या रुग्णाची चौकशी करणे, तापीचा रुग्ण आढल्यास त्याचा रक्त नमूना घेऊन त्याला गृहितोपचार देणे. कार्यक्षेत्रात हिवताप फवारणी बाबी विषयीची देखरेख करणे. कार्यक्षेत्रात कायमची व तात्पुरती डासउत्पती स्थाने शोधून त्यात गप्पी मासे सोडणे. लोकांना डासआळी नियंत्रांचे महत्व समजाऊन सांगणे, हिवतापचा प्रसार होऊ नये म्हणून विविध उपाययोजना सांगणे. २) साथरोग नियंत्रण गृहभेटी दरम्यान साथीच्या आजाराचे रुग्ण शोधून काढणे. उदा. अतिसार, हगवण, पुरळ असलेल्या तापाचे रुग्ण, म...