Arogya Sevak Job Profile/ work (आरोग्य सेवक कामे/ कर्तव्य व जबादाऱ्या )
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) गट क, या पदाचे कर्तव्य व जबाबदऱ्या.
राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमांर्गत प्रत्येक ५००० लोकसंख्येकरीता , आदिवासी आणि डोंगराळ भाग्यकारीत ३००० लोकसंख्येकरीता एक उपकेंद्र स्थापन करून तेथे एक बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) व एक आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आलेली आहे. आरोग्य सेवकाने त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी पंधरा दिवसात एकदा भेट देणे आवश्यक आहे.
१) हिवताप नियंत्रण कार्यक्रम.
- दर पंढरवाड्याल प्रत्येक घरी जाऊन तापीच्या रुग्णाची चौकशी करणे, तापीचा रुग्ण आढल्यास त्याचा रक्त नमूना घेऊन त्याला गृहितोपचार देणे.
- कार्यक्षेत्रात हिवताप फवारणी बाबी विषयीची देखरेख करणे.
- कार्यक्षेत्रात कायमची व तात्पुरती डासउत्पती स्थाने शोधून त्यात गप्पी मासे सोडणे.
- लोकांना डासआळी नियंत्रांचे महत्व समजाऊन सांगणे, हिवतापचा प्रसार होऊ नये म्हणून विविध उपाययोजना सांगणे.
२) साथरोग नियंत्रण
- गृहभेटी दरम्यान साथीच्या आजाराचे रुग्ण शोधून काढणे. उदा. अतिसार, हगवण, पुरळ असलेल्या तापाचे रुग्ण, मेंदुदाह, धनुर्वात, कावीळ, घाटसर्प, पोलिओ इ. आणि अचानक अपेक्षेपेक्षा जास्त रुग्ण आढल्याळ तातडीने आरोग्य सहायक व वैद्यकीय अधिकारी यांना कळविणे.
- क्षारसंजीवणी चे द्रावण करून अतिसार रुग्णांना वयोगटणूसार देणे.
३) आयोडीन न्यूनता विकार कार्यक्रम
- आयोडीन च्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराचे रुग्ण शोधून काढणे.
- कार्यक्षेत्रात वापण्यात येणाऱ्या मिठाचे नमुने प्रयोगशाळेत तपसण्याकरीत पाठवणे.
४) परिसर स्वच्छता
- सार्वजनिक पाण्याच्या साठ्यांनची नियमित शुद्धीकरणाची खात्री करणे.
- कार्यक्षेत्रातिल पाणी नमुने आणि विरंजक चूर्ण नमुने तपासणी करीत नियमित प्रयोगशाळेत पाठवणे.
- लोकांना परिसर स्वच्छता, संडास चा उपयोग, बिनधूराची चूल व उपयोग, मलमूत्र व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट या संदर्भात आरोग्य शिक्षण देणे.
५) क्षयरोग
- संशयित क्षयरोगी शोधून थुंकी नमूना घेणे व तो तपसणीकरीत प्राथमिक आरोग्य केंद्र किव्हा क्षयरोग केंद्रात पाठवणे.
- क्षयरुग्णच्या नियमित उपचाराची खात्री करणे.
- दोन अठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला व ताप असल्यास लोकांना थुंकी नमूना तपासणीस पाठवण्याकरिता आरोग्य शिक्षण देणे.
६) कुष्ठरोग
- गृहभेटीदरम्यान कातडीवर चट्टा असल्यास किव्हा कातडीच्या रंगामद्धे बदल असल्यास व त्यामध्ये संवेधणा नसल्यास अश्या रुग्णांची नोंद करणे.
- कुष्टरोगामुळे व्यंगवत्व येऊ नये या विषयी आरोग्य शिक्षण देणे.
- अनियमित व अपूर्ण औषध उपचार घेतलेल्या रुग्णांना पूर्ण औषध उपचार घेण्यास प्रवृत्त करणे.
- नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवणे.
७) प्रथमोपचार व किरकोळ आजारावर उपचार करणे.
- प्रथमोपचारचे साहित्य, क्षारसंजीवनी पाकिटे व किरकोळ आजारवारील औषधे योग्य त्या व्यक्तीला उपलब्ध करून देणे.
८) अहवाल नोंदी ठेवणे
- कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाची माहिती आद्यावत ठेवणे.
- आरोग्य सेविकच्या मदतीने योग्य गोडप्याची नोंद ठेवणे.
- केलेल्या कामाचा पुरावा म्हणून नोंदवही व अहवाल ठेवणे.
